Home अध्यात्मिक ह्या चार गोष्टी करणे सोडलं तर स्वामी कधीच पथीशि राहणार नाही

ह्या चार गोष्टी करणे सोडलं तर स्वामी कधीच पथीशि राहणार नाही

0
ह्या चार गोष्टी करणे सोडलं तर स्वामी कधीच पथीशि राहणार नाही

नमस्कार मित्रांनो..Marathi Karbhar या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ भक्तहो या चार गोष्टी केल्या तर स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी कायम राहतील. स्वामींची भक्ती तर आपण सगळेच करतो, आज आपण सोप्या उपासना बघणार आहोत की ज्या केल्यावर स्वामी दिवसभर आपल्या सोबत राहतात. आपण कामावर जात असू किंवा लांबच्या प्रवासाला जात असतो त्या दरम्यान स्वामींचे सुरक्षा कवच हे आपल्याला प्राप्त होते.सर्वात प्रथम आहे तारक मंत्र.

तारक मंत्र चा महिमा फार मोठा आहे. काही जणांचे तारक मंत्राचा आधार घेऊन मोठमोठे आजार बरे झाले आहेत. स्वामींना जवळ किंवा देवघरात एक उदबत्ती लावायची आहे. तांब्याचा पेला असा ठेवायचा आहे की उदबत्ती राख त्यात पडेल. आणि त्यांनतर तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ते राख पडलेले पाणी प्यायचं आहे.

दुसरी उपासना घरातून बाहेर पडताना स्वामींना मुजरा करायचा आहे. तसेच स्वामी माझ्यासोबत चला असं म्हणून त्यांना विनंती करावी आणि आपण ज्या कामासाठी जात असाल तेही सांगावे.

तिसरी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडताना स्वामींचा अंगारा जरूर लावावा जर डोक्याला लावायला नसेल तर छातीला लावावा मगच घरातून बाहेर पडावं.

चौथी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडल्यावर सतत स्वामींचे नामस्मरण करीत राहायचं. बस ट्रेनची वाट बघत असताना तो वेळ नामस्मरण साठी वापरावा प्रवासात छान वाटते. प्रवासामुळे येणारी नकरात्मकता येत नाही. आपण प्रसन्न राहतो या सगळ्या उपासना नक्की करा. या उपासनांचा लाभ घ्या संकटातून तुम्ही अलगत तारले जातात. तसेच भक्त हो या काही गोष्टी आहेत ते स्वामींना अजिबात आवडत नाही तेही आपण पाहूयात.

आज आपण स्वामींना कुठले गुण आवडत नाहीत हे बघणार आहोत तर सर्वात प्रथम तुम्ही जसे आहात तसेच वागा. मी उगीच कोणीतरी आहे, मोठा आहे असे मानणे, दुसऱ्याला तुच्छ लेखणे हे सोडून द्या. तुम्ही आहात तसेच जगासमोर वागा. लोक काय बोलतील आपल्याला लोक कमी तर समजणार नाही ना असा खोटा विश्वास आणून वागू नका. लोकांकडे लक्ष देऊ नका.

श्री स्वामींवर विश्वास ठेवा चांगले वागा, तुमच्याही बाबतीत चांगलेच होईल.तुम्हाला जे मनापासून वाटते ते करा, लोक करतात म्हणून मीही करणार हे करू नका कोणत्याही बाबतीत करू नका. स्वामींना आळशी भक्त अजिबात आवडत नाहीत आपल्याला घरचं काम जमत नसेल तर ठीक आहे पण जमत असताना त्या मधे अजिबात आळशीपणा करू नका..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here