Home अध्यात्मिक प्रार्थना कशी व का करावी?

प्रार्थना कशी व का करावी?

0
प्रार्थना कशी व का करावी?

नमस्कार मित्रांनो.. Marathi Karbhar या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येक जण स्वामी समोर आपले म्हणणे मांडत असतो. आपल्याला काय हवं नको ते ब्रम्हांड नायकाला सांगत असतो. स्वामी देखील आपली इच्छा पूर्ण करत असतात. परंतु जे आपण संगतो आपले म्हणणे देवासमोर मांडतो त्याची एक पद्धत असते. त्यालाच प्रार्थना देखील म्हटले जाते. आज आपण प्रार्थना म्हणजे काय? आणि प्रार्थनेचे महत्व काय ते जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात.

भक्त आणि भगवंताला जोडणारा पूल म्हणजे प्रार्थना..!! प्रार्थना ही ईश्वराशी संपर्क साधण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. प्रार्थना हे प्रेमाचे अलौकिक भाषा आहे. या प्रेम भाषेत भक्त साक्षात ईश्वराची जवळीक साधतो हितगुज करतो व प्रभूचा प्रतिसाद प्राप्त करतो. हृदयाच्या गाभाऱ्यातून उमटलेली प्रामाणिक आर्त हाक म्हणजे प्रार्थना. अंतरात्म्याचा आवाज म्हणजे प्रार्थना, प्रार्थना म्हणजे आत्म्याचे दिव्य संवेदना. सुखद अनुभूती ईश्वराची हृदय संवाद म्हणजे प्रार्थना.

मित्रांनो, भक्त आणि भगवंत यांना घट्ट प्रेमरंगी जोडणारा भाव सागरावरचा पूल आहे. मात्र प्रार्थना म्हणजे एक मागणी नव्हे कारण तो आत्म्याचा ध्यास आहे. नियत्यांशी एकच स्वरूपथा साधण्याचे अंतकरणाची तळमळ आहे. प्रार्थना जगनियंत्याच्या कृपाप्रसादासाठी केलेला धावा होय. प्रार्थना भयग्रस्ताचा निराधाराचा भरोसा आहे.

प्रार्थनेचे महत्त्व – प्रार्थनेचे महत्त्व अमोल आहे. प्रार्थनेचा साधकाला खात्रीचा आधार असतो. कल्पना करतो त्यापेक्षा कितीतरी पट जास्त फायदा प्रार्थनाने होतो. आपल्या अंतकरणातील पवित्र बुद्धी उफाळून वर येत असते. ती आपल्या हृदयाला उल्हासित करून आपल्या पात्रतेचे उन्नयन करते. श्रद्धेचा दीपक सतत प्रगती ठेवणारे इंधन म्हणजे प्रार्थना. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण एवढेच प्रार्थना याची शक्ती सत्य आहे.

देवतेच्या संकल्पनेबरोबरच प्रार्थना याचा जन्म झाला आहे. आदीकाळापासून मानव प्रार्थना करीत आलेला आहे. वेद वाङ्मयात पंचमहाभूतांच्या प्रार्थना आढळतात. फार प्राचीन काळापासून प्रार्थना हे साधकाचे उपासनेचे प्रमुख अंग बनलेले आहेत. सर्व धर्मात प्रार्थना मान्य आहे. प्रत्येक देशात प्रार्थना मंदिरे आहेत. सर्वधर्म ग्रंथात प्रार्थना गीते स्तोत्र इत्यादी समाविष्ट आहेत.

मित्रांनो, प्रार्थनेचे मनाचे उन्नयन होते. मनाला कमालयाची शांती लाभते. प्रार्थनेचे शुद्ध होते, प्रार्थनेने एकाग्रता लाभते प्रार्थनेने आजार मुक्त झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. प्रार्थनेचे वैश्विक सामर्थ्य केव्हा वर्णनात्मक वर्णनातीत आहे.

‘अशुभाने मेरा चेष्टे तनुती शुभ संचितम’ – हे ते प्रार्थनेचे वैश्विक सामर्थ्य आहे. शुभ व अशुभ विचारांच्या परमाणुच्या अंतराळात गर्दी झालेली असते. अशुभांचे आक्रमन तो पावण्यासाठी म्हणून प्रार्थनेचे नितांत गरज आहे. तसेच वातावरणात प्रस्तुत होणाऱ्या इतरांच्या अशुभ विचारांविरुद्ध शुभ विचारांचे प्रक्षेपण करण्यासाठी प्रार्थनेची नितांत गरज आहे.

संत सिद्ध पुरुषांची पदे, गीते, अभंग, काव्य, स्तोत्र प्रार्थनाच होत. संतांनी रचलेले प्रार्थना गीते तालासुरावर म्हणून प्रार्थना करणे अधिक चांगले कारण संगीत आणि चित्तरचे एकाग्रता अधिक लवकर साधते. संतांच्या प्रार्थना गीतांमध्ये एका तऱ्हेची शक्ती सामावलेली असते. ती उत्स्फूर्त असतात.

अशा प्रार्थना साधकाच्या मन:शक्ती आत्मज्योती प्रफुल्लित करू शकतात. श्री ज्ञानदेव यांचे पसायदान सर्व प्रार्थना गीतांत नव्हे नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वश्रेष्ठ आहेत. ‘तमसोमा ज्योतिर्गमय किंवा सर्वत्र सुखिन: संनतू’.. वगैरे प्रार्थना श्लोक सुद्धा उदांत निरपक्ष प्रार्थनेचे सर्वोत्तम उदाहरण आहेत

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here