Home अध्यात्मिक स्वामीलीला! जी मनाला खूप सारा आनंद देऊन जाईल

स्वामीलीला! जी मनाला खूप सारा आनंद देऊन जाईल

0
स्वामीलीला! जी मनाला खूप सारा आनंद देऊन जाईल

नमस्कार मित्रांनो.. .Marathi Karbhar या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!अक्कलकोट मधील स्वामी दरबारात अनेक सेवेकरी स्वामी नियोजन प्रमाणे योग्य वेळी सेवेत दाखल होत होते. यातच जमखींड जवळील गोटे गावात अनंत भट म्हणून एक यजुर्वेदी ब्राह्मण रहात होते. त्यांना सात मुले होती. त्यातील एकाचे नाव श्रीपाद होते. श्रीपाद अत्यंत सदाचारी होते. एके दिवशी श्रीपाद अक्कलकोट मध्ये स्वामी च्या दर्शनासाठी आले. त्यांच्या हातात हार श्रीफळ होते.

स्वामींची अजाणू बाहू मूर्ती पाहून त्यांचे डोळे क्षणभर दिपले. त्यानंतर हार, श्री फळ स्वामी चरणी वाहिले. दोन्ही हात जोडून स्वामींचे दर्शन घेतले. आणि हात जोडून उभे राहिले. इतक्यात स्वामींनी त्यांच्या कडे पाहिले आणि बोलले, अरे श्रीपाद आता तू आमच्या जवळ रहा. आमची सेवा कर यातच तुझे कल्याण आहे. स्वामींनी असे बोलताच श्रीपाद भट यांना खूप आनंद झाला.

प्रत्यक्ष परब्रह्म ची सेवा करायला मिळत आहे. हा आनंद त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. स्वामी आज्ञेप्रमाणे नंतर श्रीपाद स्वामी दरबारात राहू लागले. स्वामींची सर्व सेवा मनोभावे करू लागले. जिथे स्वामी जातील तिथे स्वामींची सर्व व्यवस्था ते करून ठेवत. स्वामी महाराज सुद्धा श्रीपाद भटांची आदून मधून परीक्षा बघत. सर्वांच्या समोर कधी कधी शिव्या देत. त्यांचा अपमान सुद्धा करत.

परंतु श्रीपाद भट यांना स्वामी महाराज पूर्ण परब्रह्म आहेत. याची समज होती. त्यांची स्वामींच्या चरणी निष्ठा थोडी सुद्धा कमी होत नव्हती. उलट आपण स्वामींच्या शाळेत आहोत. स्वामी आपले कल्याण करत आहेत. स्वामी महाराज आपला विकास करत आहेत. हा त्यांचा विश्वास अतिशय दृढ होत होता. पुढे काही दिवसांनी चोळप्पा यांनी आपल्या मुलीचा विवाह श्रीपाद भट यांच्यासोबत लावून दिला.

आणि स्वामींच्या सानिध्यात राहून श्रीपाद भट यांनी आपला प्रपंच आणि परमार्थ साध्य केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दरबारात व्यवस्था करणाऱ्या मंडळी पैकी श्रीपाद भट हे एक होते. त्या पात्रा कडून आपल्याला सर्वात महत्वाचे एक गोष्ट शिकायला मिळते. स्वामी बद्दल असलेली निष्ठा.

स्वामी महाराज त्यांची नेहमी परीक्षा घेत. सर्व लोकांसमोर शिव्या वगैरे देऊन अपमानित करत. त्यांची स्वामी बद्दल ची निष्ठा अजिबात दलमळली नाही. स्वामी महाराज हे ऐश्वर्य विधुती आहेत. पर ब्रह्म आहेत. हा विश्वास त्यांचा कायम होता. स्वामी भक्त हो आजच्या लिलेतून बोध घेता. आज आपल्याला निष्ठा नावाचा गुण धारण करायचा आहे.

निष्ठा म्हणजे बेशर्त प्रेम निष्ठा म्हणजे अतूट अभेद्य विश्वास निष्ठा म्हणजे समर्पण आजच्या झपाट्याने विकास करणाऱ्या मानवासाठी तर निष्ठा नावाचा गुण अत्यंत महत्वाचा आहे. आधुनिक युगात मानवाचे मन अधिकच चंचल होत चालले आहे. झटपट विकास करण्याच्या नादात मानवाच्या जगण्याचा दर्जा खालावत चालला आहे.

तो जे पण पात्र निभवतो आहे. नाती निभावत आहे. त्या नात्यात त्याला शांती मिळत नाही. आनंद नाही. स्वामी भक्त हो आजच्या लीलेे त आपल्याला प्रेरणा घेत निष्ठा नावाचा गुण दृढ करायचा आहे. बघा श्री गुरु आणि शिष्य या नात्या मध्ये श्रीपाद भट हे शिष्याचे नाते निभावत होते. यात स्वामी महाराज श्रीपाद भट यांच्या वर रागवायचे , सर्व समोर शिव्या द्यायचे. परंतु स्वामी आपली परीक्षा घेत आहेत.

स्वामी आपला विकास करत आहेत. हा विश्वास त्यांचा दृढ होता. थोडक्यात श्रीपाद भट यांना स्वामी च्या रागवण्यामागील शिव्या घालण्या मागील शुद्ध भाव समजत होता. तसेच स्वामींच्या पृथ्वीवरील जीवन रुपी शाळेत मिळालेली सर्व नाती ही विकासासाठी दिलेली आहेत. ही समज दृढ ठेवून अतिशय निष्ठेने आपल्याला निभवायचे आहे.

एखादी घटना घडताच तेथे प्रतिसाद देण्यापूर्वी समोरील व्यक्तीची त्यामागील असणारी भावना समजावून घ्यायची आहे. जसे एखाद्या मुलाला काही कारणामुळे त्याचे वडील रागावले. त्यांची रागवण्या मागील भावना समजावून घ्यायची आहे. आणि स्वामी आपल्याला काय शिकवत आहेत तो सकारात्मक अर्थ घेऊन पित्या प्रती असलेले आपले एका पुत्राचे कर्तव्य निष्ठेने करत राहायचे आहे.

आपला कोणी मित्र असेल किंवा कोणी भरकटत असेल तर त्याला भरकटण्या पासून परावृत्त करायचे आहे. त्याच्या प्रती असलेले आपले नाते निष्ठेने निभावयाचे आहे. स्वामींनी आपल्याला खूप छान सोनेरी नाती दिलेली आहेत. ही नाती निष्ठेने निभावणं सुद्धा स्वामी भक्तीच आहे. स्वामी सेवाच आहे.

किंबहुना स्वामी हुकूम च आहे. आणि आपल्याला स्वामी हुकूम चे पालन करत आनंदी जीवनाची आभिव्याती करायची आहे. चला तर मग आज आपण स्वामी महाराज यांना प्रार्थना करुया. हे श्री गुरू समर्था मी तुमच्या पृथ्वीवरील जीवन रुपी शाळेत शिकतो आहे. या शाळेत सतत तुम्ही मला काही शिकवत आहात.

माझा विकास व्हावा म्हणून तुम्ही मला खूप छान नाती दिलेली आहे. हे आई माझ्या मनात ह्या सर्व नात्यानं प्रती असलेली निष्ठा दूर करा. सर्वांप्रती बे शर्त प्रेम भाव द्या. सर्वांचे चांगले करा. सर्वांना सुखात ठेवून त्यांचे कल्याण करा. आणि तुम्हाला अपेक्षित आनंदी सुखी समृद्धी जीवनाची अभिव्याति करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here