Home जरा हटके तुमच्या हि नखावर तीळ आहे का? असेल तर उलगडेल तुमचे रहस्य….

तुमच्या हि नखावर तीळ आहे का? असेल तर उलगडेल तुमचे रहस्य….

0
तुमच्या हि नखावर तीळ आहे का? असेल तर उलगडेल तुमचे रहस्य….

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… समुद्र ऋषी हे सामुद्रिक शास्त्राचे लेखक आहेत. या शास्त्रात त्यांनी शरीराच्या अवयवांची रचना आणि त्यावर बनवलेल्या खुणा, त्यानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वावर कसा परिणाम होतो, याविषयी युक्तिवाद केलेले आहेत. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर व नखांच्या तिळांवरून माणसाचा स्वभाव आणि वागणूक कळू शकते, असे म्हणतात. असे म्हटले जाते की नखावर असलेला तीळ व्यक्तीच्या स्वभावाबद्दल अनेक विशेष अशी रहस्य सांगत असतो.

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर कोठे ना कोठे तरी तीळ नक्कीच असतो. काही ठिकाणी असलेल्या तीळामुळे सौंदर्यात भर पडते, तर काही विशिष्ट ठिकाणी असलेले तीळ तुम्ही धनवान होणार आणि विदेश यात्रा करणार असे सूचित करतात.

त्याचबरोबर आपल्या शास्त्रांनुसार शरीराच्या वेगवेगळ्या भागांप्रमाणे नखांच्या तिळांवरून माणसाचा स्वभाव आणि वागणूक कळू शकते, असे म्हणतात. नखांवरील तीळ व्यक्तीबद्दल अनेक रहस्य सांगण्यास सक्षम असतात, असं ही मानलं जातं.

मित्रांनो आज आपण नखावर तीळ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की, अंगठ्याच्या नखावर तीळ असणारी व्यक्ती कशी असते.

याबद्दल, मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या नखावर तीळ असतो, ती व्यक्ती खूप प्रभावशाली असते, असं म्हटलं जातं. ही व्यक्ती जिथे जाते तिथे लोकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात, असे लोक भविष्यात नेते म्हणून काम करतात, असंही आपल्या शास्त्रांमध्ये म्हटल जात.

त्याचबरोबर मित्रांनो जर तर्जनीच्या नखावर तीळ असेल तर अशी व्यक्ती भावूक बनते, असं म्हटलं जातं. अशा व्यक्तीच्या भावनिकतेचा लोक फायदा घेतात आणि त्यांच्याकडून काम काढून घेतात आणि अशा लोकांनी जास्त मित्र बनवू नये असा सल्लाही त्यांना दिला जातो कारण त्यांच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते.

आणि मधल्या बोटाच्या नखावर तीळ मधल्या बोटाच्या नखावर तीळ असल्यास व्यक्तीची बुद्धिमत्ता वाढते. असे म्हणतात की, अशा लोकांमध्ये शक्तीची कमतरता असते. हे लोक खूप नखरे करतात. छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचा राग येतो, त्यांचे खूप सारे मित्र असतात.

मित्रांनो जर अनामिकेच्या नखावर तीळ असेल तर आपल्या सामुद्रिकशास्त्रात असे मानले जाते की अनामिकेच्या नखावर तीळ असलेला मनुष्य प्रसन्न असतो आणि असे लोक हुशार असतात, त्यांना कोणत्याही परिस्थितीची लवकर माहिती होते.

आणि त्याचबरोबर हे लोक परिस्थितीवर मात करून यश मिळवण्यासाठी खूप मेहनत ही घेत असतात. त्याचबरोबर जर करंगळीच्या नखावर तीळ असेल तर अशी व्यक्ती खूपच हुशार व बुद्धिमान असते आणि ज्या लोकांच्या करंगळीच्या नखेवर तीळ असतो ते स्वभावाने खूप चंचल असतात, परंतु या लोकांचं मन कुठेही लागत नाही आणि त्याचबरोबर अशा लोकांना खूप मित्र असतात.

टिप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here