Home जरा हटके या व्यक्तीच्या पाया कधीच पडू नका नाही स्वतःला बरबाद होण्यापासून नाही वाचवू शकणार

या व्यक्तीच्या पाया कधीच पडू नका नाही स्वतःला बरबाद होण्यापासून नाही वाचवू शकणार

0
या व्यक्तीच्या पाया कधीच पडू नका नाही स्वतःला बरबाद होण्यापासून नाही वाचवू शकणार

नमस्कार मित्रांनो.. Marathi Karbhar या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! हिंदू धर्म हा सर्व धर्मा पैकी सर्वश्रेष्ठ धर्म आहे. या धर्मामध्ये आपण अनेक परंपरांचे पालन करत असतो. त्यामध्ये चरण स्पर्श करणे म्हणजे पाया पडणे. ही एक महत्वाची परंपरा आहे. चरण स्पर्श करणे म्हणजे आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीच्या पाया पडत असतो. ज्या व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत आपण त्यांच्या पाया पडत असतो. चरण स्पर्श करतो याला वेगवेगळी कारणे आहेत. मात्र अशा तीन व्यक्ती आहेत त्यांच्या आपण चुकूनही पाया पडायचे नाहीत. कारण अशा व्यक्तींच्या पाया पडल्याने आपल्यांना भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तर अशा तीन व्यक्ती कोणत्या ते आम्ही सांगणार आहोत.

आपण आपल्या आई-वडिलांच्या गुरुजींच्या किंवा संतांच्या पाया पडतो. आपले हात त्यांच्या चरणाला स्पर्श करतो. व त्यांचे हात आपल्या डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर स्पर्श करत असतात. या क्रियेमुळे आपल्या आई-वडिलांचे, गुरुजींचे, संतांचे सकारात्मक ऊर्जा आणि आपल्याबद्दल असणारे भाव, प्रेम आशीर्वाद, वात्सल्य असे सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होतात.

व त्यांच्या आशीर्वादामुळे आपण प्रत्येक कामात यशस्वी होतो. आपण उंच शिखरे गाठत असतो म्हणून सकाळी उठल्यावर देवांची आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घेत असतो. आपल्याला माहित आहे की श्रीकृष्णांनीसुद्धा गरीब स्वामीचे चरण स्पर्श केले. तसेच आपण नवरात्रीला कन्या पुजन वेळी कन्यांचे चरण स्पर्श करतो. तसेच सुहासिनीला पण आपण हळद-कुंकू देऊन त्यांचे चरण स्पर्श करतो. व त्यांचे आशीर्वाद आपण घेत असतो.

आता पण हे जाणून घे की अशा तीन कोणत्या व्यक्ती आहेत की त्यांच्या चुकूनही पाया पडू नये.

पहिली व्यक्ती आहे आपला शत्रू. या जगात आपले सर्वच मित्र असतात असे नाही. तर त्यातली काही जण शत्रू सुद्धा असतात. तोंडासमोर गोड बोलतात आणि पाठीमागे वाईट चितत असतात. त्यांना आपले चांगले झाले भगवत नाही.

सतत आपले वाईट व्हावे त्यांना असे वाटत असते. अशा व्यक्तींच्या कधीही पाया पडू नये.जरी आपण त्यांच्या पाया पडलो तरी ते आपल्याला शुभआशीर्वाद देणार नाहीत. वाईटच आशीर्वाद देणार. कारण ते तुमच्याविषयी नकारात्मक विचार करत असतात. म्हणून त्यांच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते.

हे पाया पडताना आपल्या शरीरामध्ये ती प्रवाहित होत असते आणि त्याचे घातक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपली चालू असलेली प्रगती खंडित होते. आणि आपण अधोगतीला जातो. म्हणून आपण आपल्या शत्रूच्या पाया कधिही पडू नये.

दुसरी व्यक्ती आहे व अधर्मीय चारित्र्यहीन पापी लोक. जे लोक आपल्या धर्माचे पालन करत नाहीत. जे चरित्रहीन आहेत. ज्यांना चारित्र्य नाही. जे पापी लोक आहेत अशा लोकांच्या कधीही पाया पडू नका.

तुम्ही जर अशा व्यक्तींच्या पाया पडला तर तुम्ही धर्मभ्रष्ट होणार. तुम्ही अनैतिक होऊन पैसे कमवणे पेक्षा अशा अधर्मीय चारित्र्यहीन आणि पापी लोकांच्या चुकूनही पाया पडू नका.

तिसरी व्यक्ती ती म्हणजे अनोळखी व्यक्ती. जी व्यक्ती अजान आहे, अनोळखी आहे, जिला आपण कधी पाहीलच नाही. तुम्ही ओळखत नाही. त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हेही तुम्हाला माहीत नाही. ते धर्म भ्रष्ट आहे की नाही याची तुम्हाला कल्पना नसते.

ते व्यक्ती तुमच्या विषयी काय विचार करतात हेही तुम्हाला माहीत नाही. अशा व्यक्तींच्या पाया पडल्याने कोणती ऊर्जा आपल्या शरीरात प्रवाहित होईल ते ही आपल्याला माहित नसते. म्हणून अनोळखी व्यक्तींच्या कधीही पाया पडू नका.

आपण अशाच व्यक्तीच्या पाया पडले पाहिजे की जे आपल्यापेक्षा मोठे आहेत ज्येष्ठ आहेत. आपण ज्या ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडतो त्यांचा कधी अपमान करायचा नाही. त्यांना कधीही अपशब्द वापरायचा नाही. जे आपले शत्रू आहेत. व अधर्मीय आहेत, चारित्रहिन व पापी आहेत, आणि आपण ज्यांना ओळखत नाही. त्यांच्या कधीही पाया पडू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here